ॐ नमो जी आद्या | वेद प्रती पाद्या |
जय जय स्वसंवेद्या |आत्मरुपा ||१ ||
देवा तूंचि गणेशु | सकालार्थमंती प्रकाशु |
म्हणे निवृत्ती दासु | अवधारीजो जी ||२ ||
हे शब्दब्रम्ह अशेष | तेचि मूर्ती सुवेश |
तेथ वर्णवपु निर्दोष | मिरवत असे ||३ ||
स्मृती तेची अवयव | देखा अंगिकभाव |
तेथ लावण्याची ठेव | अर्थशोभा || ४ ||
अष्टादश पुराणे | तीचि मणिभूषणे |
पदपद्धती खेवणे | प्रमेयरत्नांची ||५||
पदबंध नागर | तेचि रंगाथिले अंबर |
जेथ साहित्यवाणे | सपूर उजाळाचे ||६||
देखा काव्यनाटका | जे निर्धारिता सकौतुका |
त्याचि रुणझुणती क्षुद्रघंटिका | अर्थध्वनी || ७||
नाना प्रमेयांचि परी | निपुणपणे पाहता कुसरी |
दिसती उचित पदे माझारी | रत्नें भली || ८||
तेथ व्यासादिकांच्या मति | तेचि मेखळा मिरवती |
चोखाळपणे झळकती | पल्लवसडका || ९||
देखा षड्दर्शने म्हणिपती | तेचि भुजांची आकृती ||
म्हणऊनि विसंवादे धरिती | आयुधे हाती || १०||
तरी तर्क तोचि परशु | नीतिभेदु अंकुशु |
वेदांतु तो महारसु | मोदकाचा || ११ ||
एके हाति दंतु | जो स्वभावता खंडितु |
तो बौद्धमत संकेतु | वार्तिकांचा || १२ ||
मग सहजे सत्कारवादु | तो पद्मकरु वरदु |
धर्मप्रतिष्ठा तो सिद्धु | अभयहस्तु || १३ ||
देखा विवेकमंतु सुविमळु | तोचि शुंडादंडु सरळु |
जेथ परमानंदु केवळु | महासुखाचा || १४ ||
तरी संवादु तोचि दशनु | जो समताशुभ्रवर्णु |
देवो उन्मेषसुक्ष्मेक्षणु | विघ्नराजु || १५ ||
मज अवगमलिया दोनी | मीमांसा श्रवणस्थानी |
बोधमदामृत मुनी | अलि सेविती || १६ ||
प्रमेयप्रवाल सुप्रभ | द्वैताद्वैत तेचि निकुंभ |
सरिसे एकवटत | इभ मस्तकावरी || १७ ||
उपरि दशोपनिषदे | जिये उदारे ज्ञानमकरंदे |
तिये कुसुमे मुगुटी सुगंधे | शोभती भली || १८ ||
अकार चरणयुगुल | उकार उदर विशाल |
मकार महामंडल | मस्तकाकारे || १९ ||
हे तिन्ही एकवटले | तेथ शब्दब्रह्म कवळले |
ते मियां गुरूकृपा नमिले | आदिबीज || २० ||
आतां अभिनव वाग्विलासिनी | जे चातुर्यार्थकला कामिनी |
ते शारदा विश्वमोहिनी | नमिली मियां || २१ ||
मज हृदयी सद्गुरू | तेणे तारिलो हा संसारपूरु |
म्हणऊनि विशेष अत्यादरू | विवेकावरी || २२ ||
जैसे डोळ्यां अंजन भेटे | मग दृष्टीसी फांटा फुटे |
मग वास पाहे तेथ प्रकटे | महानिधी || २३ ||
का चिंतामणी जालया हाती | सदा विजयवृत्ति मनोरथी |
तैसा मी पूर्णकाम निवृत्ती | ज्ञानदेवो म्हणे || २४ ||
म्हणोन जाणतेनो गुरू कीजे | तेणे कृतकार्य होईजे |
जैसे मूळसिंचने सहजे | शाखापल्लव संतोषती || २५ ||
का तीर्थे जिये भुवनी | तिये घडती समुद्रावगहनी |
ना तरी अमृतरसास्वादनीं | रस सकळ || २६ ||
तैसा पुढतपुढती तोची | मियां अभिवंदिला श्रीगुरूचि |
जे अभिलषित मनोरुची | पुरविता तो || २७ ||
आता अवधारा कथा गहन | जे सकळां कौतुका जन्मस्थान |
की अभिनव उद्यान | विवेकतरूचे || २८ ||
ना तरी सर्व सुखांची आदि | जे प्रमेयमहानिधी |
नाना नवरससुधाब्धि | परिपूर्ण हे || २९ ||
की परमधाम प्रकट | सर्व विद्यांचे मूळपीठ |
शास्त्रजाता वसिष्ठ | अशेषांचे || ३० ||
ना तरी सकळ धर्मांचे माहेर । सज्जनांचे जिव्हार ।
लावण्यरत्नभांडार । शारदियेचे ॥ ३१॥
नाना कथारूपे भारती । प्रकटली असे त्रिजगती ।
आविष्करोनी महामती । व्यासाचिये ॥ ३२॥
म्हणोनी हा काव्यां रावो । ग्रंथ गुरुवतीचा ठावो ।
एथुनि रसां आला आवो । रसाळपणाचा ॥ ३३॥
तेवींचि आइका आणिक एक । एथुनि शब्दश्री सच्छास्त्रिक ।
आणि महाबोधि कोवळीक । दुणावली ॥ ३४॥
एथ चातुर्य शहाणे झाले । प्रमेय रुचीस आले ।
आणि सौभाग्य पोखले । सुखाचे एथ ॥ ३५॥
माधुर्यी मधुरता । शृंगारी सुरेखता ।
रूढपण उचितां । दिसे भले ॥ ३६॥
एथ कळाविदपण कळा । पुण्यासी प्रतापु आगळा ।
म्हणऊनि जनमेजयाचे अवलीळा । दोष हरले ॥ ३७॥
आणि पाहता नावेक । रंगी सुरंगतेची आगळीक ।
गुणां सगुणतेचे बिक । बहुवस एथ ॥ ३८॥
भानुचेनि तेजें धवळले । जैसे त्रैलोक्य दिसे उजळले ।
तैसे व्यासमती कवळले । अवघे विश्व ॥ ३९॥
कां सुक्षेत्रीं बीज घातले । ते आपुलेयापरी विस्तारले ।
तैसे भारतीं सुरवाडले । अर्थजात ॥ ४०॥
ना तरी नगरांतरी वसिजे । तरी नागराचि होइजे ।
तैसे व्यासोक्तितेजे । धवळित सकळ ॥ ४१॥
कीं प्रथमवयसाकाळीं । लावण्याची नव्हाळी ।
प्रकटे जैसी आगळी । अंगनाअंगी ॥ ४२॥
ना तरी उद्यानी माधवी घडे । तेथ वनशोभेचि खाणी उघडे ।
आदिलापासोनि अपाडे । जियापरी ॥ ४३॥
नाना घनीभूत सुवर्ण । जैसे न्याहाळितां साधारण ।
मग अलंकाती बरवेपण । निवाडु दावी ॥ ४४॥
तैसे व्यासोक्ती अळंकारिले । आवडे ते बरवेपण पातले ।
ते जाणोनि काय आश्रयिले । इतिहासी ॥ ४५॥
नाना पुरतिये प्रतिष्ठेलागीं । सानीव धरुनी आंगी ।
पुराणे आख्यानरूपे जगीं । भारता आली ॥ ४६॥
म्हणऊनि महाभारतीं जे नाही । ते नोहेचि लोकी तिहीं ।
येणे कारणे म्हणिपे पाहीं । व्यासोच्छिष्ट जगत्रय ॥ ४७॥
ऐसी सुरस जगीं कथा । जे जन्मभूमि परमार्था ।
मुनि सांगे नृपनाथा । जनमेजया ॥ ४८॥
जे अद्वितीय उत्तम । पवित्रैक निरुपम ।
परम मंगलधाम । अवधारिजो ॥ ४९॥
आता भारतीं कमळपरागु । गीताख्यु प्रसंगु ।
जो संवादिला श्रीरंगु । अर्जुनेसी ॥ ५०॥
ना तरी शब्दब्रह्माब्धि। मथिलेया व्यासबुद्धि ।
निवडिले निरवधि । नवनीत हे ।। ५१॥
मग ज्ञानाग्निसंपर्के । कडसिलें विवेके ।
पद आले परिपाकें । आमोदासी ॥ ५२॥
जे अपेक्षिजे विरक्ति । सदा अनुभविजे संतीं ।
सोहंभावे पारंगती । रमिजे जेथ ॥ ५३॥
जे आकर्णिजे भक्ती । जें आदिवंद्य त्रिजगतीं ।
ते भीष्मपर्वीं संगती । सांगीजैल ॥ ५४॥
जें भगवद्गीता म्हणीजे । जें ब्रह्मेशांनीं प्रशंसिजे।
जे सनकादिकीं सेविजे । आदरेसीं ॥ ५५॥
जैसे शारदियेचे चंद्रकळे- । माजीं अमृतकण कोंवळे ।
तें वेंचती मवाळें । चकोरतलगें ॥ ५६॥
तियापरी श्रोतां । अनुभवावी हे कथा ।
अति हळुवारपणे चित्ता । आणूनियां ॥ ५७॥
हे शब्देविण संवादिजे । इंद्रियां नेणता भोगिजे ।
बोलाआधि झोंबिजे । प्रमेयासी ॥ ५८॥
जैसे भ्रमर परागु नेती । परी कमळदळे नेणती ।
तैसी परी आहे सेविती । ग्रंथी इये ॥ ५९॥
का आपुला ठावो न सांडिता । आलिंगिजे चंद्रु प्रकटता ।
हा अनुरागु भोगितां । कुमुदिनी जाणे ॥ ६०॥
ऐसेनि गंभीरपणे । स्थिरावलेनि अंत:करणे ।
आथिला तोचि जाणे । मानूं इये ॥ ६१॥
अहो अर्जुनाचिये पांती । जे परिसणया योग्य होती ।
तिहीं कृपा करून संतीं । अवधान द्यावे ॥ ६२॥
हे सलगीं म्यां म्हणितले । चरणां लागोनि विनविलें ।
प्रभू सखोल हृदय आपुलें । म्हणऊनियां ॥ ६३॥
जैसा स्वभावो मायबापांचा । अपत्य बोले जरी बोबडी वाचा ।
तरी अधिकचि तयाचा । संतोष आथी ॥ ६४॥
तैसा तुम्हीं मी अंगीकारिलां । सज्जनीं आपुला म्हणितला ।
तरी सहज उणें उपसाहला । प्रार्थूं कायी ॥ ६५॥
परी अपराधु तो आणिक आहे । जें मी गीतार्थ कवळुं पाहें ।
ते अवधारा विनवूं लाहें । म्हणऊनियां ॥ ६६॥
हे अनावर न विचारितां । वायांचि धिंवसा उपनला चित्ता ।
येर्हवीं भानुतेजीं काय खद्योता । शोभा आथी ॥ ६७॥
का टिटिभू चांचूवरी । माप सूये सागरी ।
मी नेणतु त्यापरी । प्रवर्तें येथ ॥ ६८॥
आइका आकाश गिंवसावे । तरी त्याहूनि थोर होआवें ।
म्हणऊनि अपाडु हें आघवें । निर्धारिता ॥ ६९॥
या गीतार्थाची थोरी । स्वयें शंभू विवरी ।
जेथ भवानी प्रश्नु करी । चमत्कारोनी ॥ ७०॥
तेथ हरू म्हणे नेणिजे । देवी जैसें का स्वरूप तुझें ।
तैसें नित्यनूतन देखिजे । गीतातत्व ॥ ७१॥
हा वेदार्थसागरू । जया निद्रिताचा घोरू ।
तो स्वयें सर्वेश्वरू । प्रत्यक्ष अनुवादला ॥ ७२॥
ऐसें जें अगाध । जेथ वेडावती वेद ।
तेथ अल्प मी मतिमंद । काय होय ॥ ७३॥
हें अपार कैसेनि कवळावे । महातेज कवणें धवळावे ।
गगन मुठीं सुवावे । मशके केवीं ॥ ७४॥
परी एथ असे एक आधारु । तेणेचि बोलें मी सधरु ।
जे सानुकूळ श्रीगुरु । ज्ञानदेवो म्हणे ॥ ७५॥
येर्हवीं तरी मी मुर्खू । जरी जाहला अविवेकु ।
तरी संतकृपादीपु । सोज्वळु असे ॥ ७६॥
लोहाचे कनक होये । हे सामर्थ्य परिसींच आहे ।
की मृतही जीवित लाहे । अमृतसिद्धी ॥ ७७ ॥
जरी प्रकटे सिद्धसरस्वती । तरी मुकया आथी भारती ।
एथ वस्तुसामर्थ्यशक्ति । नवल कायी ॥ ७८॥
जयातें कामधेनू माये । तयासी अप्राप्य काही आहे ।
म्हणऊनि मी प्रवर्तों लाहे । ग्रंथी इये ॥ ७९॥
तरी न्यून ते पुरतें । अधिक ते सरते ।
करून घ्यावे हें तुमते । विनवीतु असे ॥ ८०॥
आता देईजो अवधान । तुम्हीं बोलविल्या मी बोलेन ।
जैसे चेष्टे सूत्राधीन । दारुयंत्र ॥ ८१॥
तैसा मी अनुग्रहीतु । साधूंचा निरोपितु ।
ते आपुला अलंकारितु । भलतयापरी ॥ ८२॥
तंव श्रीगुरू म्हणती राहीं । हे तुज बोलावे न लगे कांही ।
आता ग्रंथा चित्त देईं । झडकरी वेगा ॥ ८३॥
या बोला निवृत्तिदासु । पावूनि परम उल्हासु ।
म्हणे परियेसा मना अवकाशु । देऊनियां ॥ ८४॥